संप्रदायवाद
संप्रदायवाद
भारतीय समाजाचे एक वैशिट्य म्हणजे भारत हा अनेक धर्मपंथीयांचा देश आहे .मुळातच धर्माची शिकवण ,श्रद्धा ,आचार वैगरेंत असलेल्या फरकाचा या ना त्या कारणाने विस्फोट होऊन त्यातून सांप्रदायिक हिंसाचार माजतो .त्यात अनेक निरपराध बळी पडतात ,बेसुमार वित्तहानी होते ,वातावरणात भीती दाटून राहते .काही काळ लोक जीव मुठीत धरून राहतात .हि संप्रदायिकता व त्यातून होणार हिंसाचार हि एक पारंपरिक समस्या आहे .
संप्रदायवाद आणि सांप्रदायिक हिंसाचार हि एक अतिशय जातील अशी सामाजिक घटना आहे .संप्रदायवाद हि बहुमुखी अशी सामाजिक घटना असून वेगवेगळ्या स्तरावर तिचे स्वरूप स्पस्ट करणे आवश्य्क आहे .
संप्रदायिकता किंवा संप्रदायवाद हि एक अत्यंत गुंतागुंतीची सामाजिक घटना आहे .संप्रदायवादाला मानसिक,सामाजिक,ऐतिहासिक .आर्थिक ,राजकीय आणि सांस्कृतिक अशी बहुविध परिमाणे आहेत .त्यामुळेच संप्रदायवाद हि एक अत्यन्त गुंतागुंतीची आणि बहुमुखी वास्तविकताआहे .सामान्यपणे जेव्हा एका समुदायातील किंवा धर्मातील लोकांनी दुसऱ्या समुदायातील किंवा धर्मातील लोकांविरुद्ध वर्तन केलेले असते तेव्हा त्याला संप्रदायवाद म्हटले जाते .संप्रदायवाद या शब्दावरून दोन समुदायातील विद्वेष ,तणाव ,शत्रुत्व आणि संघर्षाच्या भावनेची अभिव्यक्ती होते .संकुचित प्रादेशिक आणि सांस्कृतिक ऐक्यभावनेची जाणीव जिथे प्रबळ असते तिथे संप्रदायवाद कमी अधिक प्रमाणात आढळतो .उदा .अलीकडच्या काही काळात आसाम,पंजाब ,केरळ ,तामिळनाडू ,काश्मीर ,व ईशान्य पूर्वेकडील काही राज्ये सांप्रदायिक हिंसाचाराची तपोभूमीच बनू लागलेली दिसून येते .संप्रदायवादामुळेच स्थिरतेला धोका उत्पन्न होतो ,शांततेला तडे जातात ,द्वेषभावनेची पैदास होते ,रचनात्मक कार्याला सुरुंग लागतात .संप्रदायवाद जेवढा धारदार बनतो तेवढी सांप्रदायिक हिंसाचाराची तीव्रता वाढत जाते .
वरील विवेचावरून संप्रदायवाद म्हणजे काय हे समजून येईल .खालील मुद्धे विचारात घेतल्यास संप्रदायवादाचे स्वरूप आणखी स्पष्ट होण्यास मदत होईल .
१.धार्मिकता आणि संप्रदायवाद ,
२. कर्मकांडवाद आणि संप्रदायवाद
३. धार्मिक मूलतत्त्ववाद आणि संप्रदायवाद
४. संप्रदायवाद --एक विचारप्रणाली
५.संप्रदायवादाला ऐतिहासिक पैलू असतो .
संप्रदायवादाचे प्रकार :
ज्येष्ठ भारतीय समाजशास्त्र टी.के .ओमेन यांनी संप्रदायवादाचे सहा विविध प्रकार स्पष्ट केले आहेत .त्यावरून संप्रदायवादाचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल .
१.सामिलीकरणात्मक संप्रदायवाद : या मध्ये छोटे धार्मिक समूह मोठया राजकीय समूहात सामिलीत होतात .एकात्म होण्याचा प्रयत्न करतात .अनुसूचित जमाती या हिंदू आहेत असा दावा संप्रदायवादी करीत असतात .
२.कल्याणकारी संप्रदायवाद : या मध्ये विशिष्ट समुदायाच्या कल्याणाचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असते .उदा .राहणीमान उंचावणे ,शिक्षण आणि आरोग्याची संधी उपलब्ध करून देणे . ख्रिश्चन असोसिएशन ख्रिशनाच्या कल्याणासाठी प्रयत्न करते किंवा पारशी असोसिएशन पर्शिनच्या उन्नतीसाठी प्रयत्न करते तेव्हा अशा तऱ्हेने सांप्रदायिक गतिशीलता हि केवळ स्वतःच्या समुदायातील लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेली दिसते .
३.अलिप्ततावादी संप्रदायवाद : यामध्ये एखादा लहानसा धार्मिक समुदाय राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो .उदा.बहाई समुदायातील लोकांना राजकीय प्रक्रियेपासून अलिप्त राहण्यासाठी या समुदायाने सूचित केले आहे .
४. सुदवादी संप्रदायवाद : या मध्ये एक धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायातील लोकांना इजा करण्याचा ,दुखापत करण्याचा ,जखमी करण्याचा प्रयत्न करीत असतात .
५. विभक्तवादी संप्रदायवाद : या मध्ये एखादा धार्मिक समूह स्वतःची सांस्कृतिक विशिष्टता स्वतंत्रपणे जपण्याचा आणि एकाच देशात राहूनही स्वतंत्र प्रादेशिक राज्याची मागणी करण्याचा प्रयत्न करीत असतो.उदा. उत्तरपूर्व भारतात मिझो आणि नागा लोकांनी किंवा बोडो लोकांची मागणी किंवा बिहारमध्ये झारखंड आदीवासींची मागणी पूर्वांचलची मागणी या सर्वातून विभक्तवादी संप्रदायवाद स्पष्ट होतो .
६. फुटीरवादी संप्रदायवाद : या संप्रदायवादात एखादा धार्मिक समुदाय आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वंतंत्र राज्याची मागणी करतो ,शीख लोकातील अगदी लहान पण उग्रवादी गटाने खलिस्तानची केलेली मागणी हे याचे उत्तम उदाहरण आहे .
वरील सहा संप्रदायापैकी शेवटचे तीन संप्रदाय हे आंदोलन सांप्रदायिक दंगल ,दहशतवाद ,बंडखोरी अशा समस्या निर्माण करणारे ठरतात
Comments
Post a Comment