स्त्री भ्रूण हत्या

 प्रस्तावना : भारतात मुलींच्या जन्माकडे आपुलकीने पाहिले जात नाही ही उघड बाब आहे हुंडा पद्धतीचा भस्मासूर या बाबी कारणीभूत आहे हुंडा बंदी कायदा असूनही अजून लोकांच्या मानसिकतेत फारसा फरक पडलेला नाही भारतातील अशिक्षितपणा रूढी-परंपरा यादेखील यास कारणीभूत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जन्माआधीच मुलींचा जन्म होण्याची टाळले जात आहे त्याचा परिणाम स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर यावर होतो आहे 2001 आणि 2011 च्या जनगणनेनुसार असे आढळले आहे की आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून मुलींचे जन्म थांबवली जात आहे त्यामुळे झिरो ते सहा वयोगटातील मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येत दर हजारी स्त्रियांचे प्रमाण 933 होते तर 2011 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण दर हजारी 914 पर्यंत खाली घसरले या दोन्ही जनगणना कालावधीत महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळते त्याचे कारण स्पष्ट आहे ते म्हणजे लिंग परीक्षण आणि त्यानंतर स्त्रीलिंग असल्यास गर्भपात केला जाणे.                         भारतीय कुटुंबांमध्ये मुलांचे ज्याप्रमाणे स्वागत होते त्याप्रमाणे मुलीचे होत नाही आणि त्याची परिणिती गर्भलिंग परीक्षा करण्यावर होते वास्तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे अशा प्रवृत्ती टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांच्या प्रयत्नामुळे हा कायदा अस्तित्वात आला आहे या कायद्याअंतर्गत गर्भलिंग निदान करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे गर्भलिंगनिदान केल्यास गर्भवती स्त्री तिचे नातेवाईक व गर्भलिंग करणारे डॉक्टर यांना शिक्षा होऊ शकते .20 सप्टेंबर 1994 रोजी माननीय राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली व हा कायदा प्रत्यक्षात 1 जानेवारी 1996 पासून अस्तित्वात आला फेब्रुवारी 2003 मध्ये त्यात सुधारणा झाली यापूर्वी हा कायदा प्रसवपूर्व निदान तंत्र म्हणजे विनिमय आणि दुरुपयोग यावरील प्रतिबंध अधिनियम 1994 म्हणून ओळखला जात असेल तर हा कायदा गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर प्रसवपूर्व निदान तंत्र विनिमय आणि दुरुपयोग प्रतिबंध गर्भलिंग निदान करण्यावर बंदी म्हणून अस्तित्वात आला आहे महाराष्ट्राने हा कायदा 1988 लागू केला आहे अशा प्रकारे कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे तरीही महाराष्ट्रात 2001 च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 922 इतके कमी होते तसेच झिरो ते सहा वयोगटातील मुला मुलींच्या बाबतीत हेच प्रमाण दर हजार मुलांमागे फक्त 913 मुली इतके राहिले त्यामुळे नैसर्गिकरीत्या मुला मुलीच्या जन्माचा समतोल ढासळतो तथापि वंशाला दिवा हवा आणि वयोवृद्ध झाल्यावर जगण्याचा आधार म्हणून मुलाच्या जन्माचा समाजामध्ये धरला जातो त्यामुळे भविष्यात सामाजिक अडचणी निर्माण होतात यासाठी गर्भातील प्रत्येक मुलगी अथवा जीव सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने तसेच मुलगा व मुलगी समान समजण्याच्या दृष्टीने समाज जागृती होणे आवश्यक आहे                        

Comments

Popular posts from this blog

संप्रदायवाद

कौटुंबिक अत्याचार : हुंडाबळी

सामाजिक अत्याचार : स्त्री भ्रूण हत्या