चंपारण्य चळवळ १९३८
चंपारण्य चळवळ १९३८
चंपारण्यास जनकराजाची भूमी म्हणतात .या भागात आंबा आणि नीळ ह्यांचे उत्पादन होत असे .सन १९१७ मध्ये ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे "तीन कठीया "शेतीत निळीची लागवड करावी असा प्रत्येक शेतकऱ्यास दंडक होता .तीन काठिया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग .एवढ्या भागात शेतकऱ्यास निळीची शेती बळजबरीने करावी लागे.त्याच्यातून राजकुमार शुक्ल या शेतकऱ्यास स्वतःचे व इतर शेतकऱ्यांचे दुःख सहन झाले नाही.त्यांनी म.गांधींची या संधर्भात भेट घेऊन त्यांना चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबद्दल कल्पना दिली त्यामुळे म.गांधींनी चंपारण्य बघण्याचे ठरविले व निळीच्या शेतकऱ्याच्या चळवळीने मूळ धरले .
गांधीजींनी सर्व प्रकारच्या लोकांकडून परिस्थितीची माहिती करून घेतली व त्या माहितीचे संकलन केले ,संकलन केलेल्या माहितीतून म.गांधींच्या असे लक्षात आले कि ,येथील राजेंद्र प्रसाद व बाबू ब्रज किशोर हे गरीब शेतकऱ्यांच्या वतीने खटले चालवीत .त्यात शेतकऱ्यांना थोडेफार यश मिळे ,परंतु हे दोघेही वकील त्या भोल्याभाबडया शेतकऱ्यांकडून फी घेत असत व हि फी हजाराच्या खाली नसे ,त्यामुळेही शेतकरी आर्थिक दृष्ट्या हि अडचणीत आला म्हणून गांधीजींनी हे खटले थांबविण्याचा निर्णय घेतला .
तीन कठीया पद्धत घालविण्यासाठी शेतकऱयांचा सरकारविषयीचा भित्रेपणा घालविणे हा एकमेव मार्ग आहे असे ठामपने सांगितले .गांधीजींनी तळागाळातल्या शेतकरयांना जास्त महत्व देऊन येणाऱ्या भविष्य काळातील संकटाची योग्य वेळेतच काळजी घेतली .या कृतीनुसार गांधीजींनी या चळवळीत सर्व वडीलधाऱ्या मंडळींनी कारकून व दुभाषी म्हणून मदत करावी अशी विनंती केली.तसेच त्यांना तुरुंगात जाण्याची शक्यताही बोलून दाखविली तसेच कारकून व दुभाष्याचे काम हे बिन पैशाने व सेवाभावाने करावे लागेल हेही ठरविले .या बाबत सर्वानी मिळून जे उत्तर दिले तेअसे "आम्ही इतके जण तुम्ही सांगाल ते काम करून घ्यायला नेहमी तयार राहू .आमच्यापैकी ज्या वेळी जेवढ्यांची मागणी कराल तेवढे तुमच्या बरोबर राहतील युरुंगात जाण्याची गोष्ट नवीन आहे त्याबाबत शक्ती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू."अशा रीतीने सर्व जण एकसंध झाले व शेतकरी चळवळीचा प्रारंभ झाला .
जेव्हा गांधीजींना चंपारण्य सोडून जायला सांगितले तेव्हा त्यांनी ,या धमकीला भीक घातली नाही .त्यावेळेस त्यांच्यावर समन्स काढून कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले .कलेक्टर ,मॅजिस्ट्रेट तसेच सुप्रीटेंडेंट यांच्याकडच्या सर्व सरकारी नोटीसही यांनी स्वीकारल्या .त्यास विरोध केला नाही .कारण त्यांना हुकुमाचा सविनय भंगच करावयाचा होता .या घटनेने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ऐक्य निर्माण झाले व इंग्रजांना त्यांची सत्ता लुप्त झाल्यासारखे झाले .या वेळेस गांधीजींना भेटण्यासाठी खूप गर्दी झाली तेव्हा याच सरकारी अधिकाऱ्यांनी गर्दी रोखण्यास मदत केली .अशा रीतीने गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे हाच खरा त्यांच्या अहिंसेचा व सत्याचा साक्षात्कार होता.
गांधीजींनी एका निवेदनातून सविनय कायदेभंगाचा वस्तुपाठ मांडला .त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले कि ,जाहीररीत्या हुकूम मोडण्याची जोखीम मला पत्करावी लागली कारण "प्रश्न आज्ञेचा अनादर करण्याचा नसून स्थनिक सरकार व माझ्यातील मतभेदाचा आहे.येथे मी जनसेवा व देशसेवा करण्याच्या इराद्याने आलो म्हणून मला या निळीवाल्या शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेणे आवश्यक आहे .निळीचे मळेवाले त्यांना न्यायाने वागवीत नाहीत व या शेतकऱ्यांनी माझी मदत मागितली तेव्हा मला त्यांचा प्रश्न अभ्यासाने आवश्यक आहे .तेव्हा हुकुमाचा भंग हा कायद्याने स्थापित झालेल्या सत्तेचा अपमान करण्यासाठी नसून एक प्रकारे कायद्याचे पालन करण्याचाच माझा हेतू आहे " त्यामुळे बरीच शेतकऱ्यांची सुरुवातीची जी तक्रारी नोंदवताना भीती होती ती नष्ट व्हायची .अशा रीतीने गांधीजींनी विनयपूर्वक सर्व चळवळ पुढे नेली व त्यात पूर्णपणे यश मिळविले .निळीच्या लागवडीची सक्ती रद्ध होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीचा न्याय मिळाला ,यातच चंपारण्य चळवळीचे यश स्पष्ट होते .चंपारण्य कृषी कायदा १मे १९३८ रोजी संमत झाला.
Comments
Post a Comment