चंपारण्य चळवळ १९३८
चंपारण्य चळवळ १९३८ चंपारण्यास जनकराजाची भूमी म्हणतात .या भागात आंबा आणि नीळ ह्यांचे उत्पादन होत असे .सन १९१७ मध्ये ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे "तीन कठीया "शेतीत निळीची लागवड करावी असा प्रत्येक शेतकऱ्यास दंडक होता .तीन काठिया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग .एवढ्या भागात शेतकऱ्यास निळीची शेती बळजबरीने करावी लागे.त्याच्यातून राजकुमार शुक्ल या शेतकऱ्यास स्वतःचे व इतर शेतकऱ्यांचे दुःख सहन झाले नाही.त्यांनी म.गांधींची या संधर्भात भेट घेऊन त्यांना चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबद्दल कल्पना दिली त्यामुळे म.गांधींनी चंपारण्य बघण्याचे ठरविले व निळीच्या शेतकऱ्याच्या चळवळीने मूळ धरले . गांधीजींनी सर्व प्रकारच्या लोकांकडून परिस्थितीची माहिती करून घेतली व त्या माहितीचे संकलन केले ,संकलन केलेल्या माहितीतून म.गांधींच्या असे लक...